विधानसभा निवडणुकांऐवजी शरद पवारच ट्रेंडिंगमध्ये!

संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या निकालाकडे लागले आहेत. मात्र निवडणुकीच्या निकालापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेच ट्रेंडिंगमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहेत.

शरद पवार

विधानसभा निवडणुकीचे निकाल आज, गुरुवारी जाहीर होत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या निकालाकडे लागले आहेत. मात्र निवडणुकीच्या निकालापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेच ट्रेंडिंगमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहेत. वयाच्या ७९ व्या वर्षी या नेत्याने आपली माणसं दुसऱ्या पक्षांमध्ये जात असताना एकटे, हिमतीने हा निवडणुकीचा किल्ला लढवला. त्यांनी केलेली भाषणं, घेतलेल्या सभा, त्यांची विधानं या सर्वांमुळे ते चांगलेच चर्चेत राहिले. त्यांचे समर्थकच नव्हे तर विरोधकांनीही त्यांच्या या शैलीचे कौतुक केले. याच कारणांमुळे कदाचित आता शरद पवार हे ट्रेंडिंगमध्येही टॉपला राहिले आहेत.

‘मला म्हातारा म्हणू नका, मी अजूनही तरुण आहे’, हे वाक्य फक्त भाषणापुरतं न ठेवता ज्यांनी प्रत्यक्षात मैदानात उतरून विरोधकांचा किल्ला एकहाती लढवला, ते ७९ वर्षांचे तरुण आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार. १ ऑक्टोबर पासून ते १९ ऑक्टोबर पर्यंत पवार यांनी ५८ सभा घेतल्या. विदर्भापासून ते कोकणापर्यंत पवार यांनी १९ दिवसांत पुर्ण महाराष्ट्रात भ्रमंती केली. पवारांची ही लढत राष्ट्रवादी काँग्रेसला मतपेटीत किती जागा देणार? हे आता उद्या २४ ऑक्टोबर रोजी कळेलच. राष्ट्रवादीला कितीही जागा मिळाल्या तरी २०१९ विधानसभा निवडणूक ही शरद पवारांच्या झंझावाती प्रचारासाठी कायम लक्षात राहिल, हे मात्र नक्की.

हेही वाचा –

बारामतीत अजित पवारांचा मोठा विजय, भाजपच्या ‘ढाण्या वाघा’चं डिपॉझिटही जप्त!