घरमहाराष्ट्रपक्षांतरं करणाऱ्यांना जनतेनं नाकारलं - उदयनराजेंना शरद पवारांनी सुनावलं!

पक्षांतरं करणाऱ्यांना जनतेनं नाकारलं – उदयनराजेंना शरद पवारांनी सुनावलं!

Subscribe

‘ज्यांनी पक्षांतरं केली, अशा लोकांसंबंधीची जनतेनं नकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे. लोकसभेची एकच जागा होती. त्या जागेकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. श्रीनिवास पाटील एकेकाळचे संसदपटू होते. एका राज्याचं राज्यपालपद त्यांनी सांभाळलं आहे. त्यांना प्रशासनाचा आणि संसदीय कामकाजाचा अनुभव आहे. त्यामुळे सातारच्या जनतेनं त्यांना चांगल्या मतांनी विजयी केलं आहे’, असं शरद पवार यावेळी म्हणाले. तसेच, ‘मी सातारच्या जनतेचा आभारी आहे. उद्या सातारला जाऊन तिथल्या जनतेचे आभार मानण्याचा प्रयत्न करणार आहे’, असं देखील ते म्हणाले. ‘ज्यांना चारच महिन्यांपूर्वी लोकांनी निवडून दिलं होतं, त्यांनी पदाचा राजीनामा देणं आणि पुन्हा निवडणुकीला उभं राहणं याला जनतेनं नाकारलं आहे’, असं देखील शरद पवारांनी यावेळी नमूद केलं.

‘सत्तेचा उन्माद जनतेला पटला नाही’

‘भाजपला सत्तेचा उन्माद आल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, जनतेला सत्तेचा उन्माद पटलेला नाही. काही लोकांनी किती टोकाची भूमिका मांडावी, याची सीमा ओलांडली होती. त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. योग्य वेळी त्यावर बोलेन’, असं शरद अशी टीका शरद पवारांनी यावेळी केली.

- Advertisement -

पंकजा मुंडेंच्या पराभवावर बोलले पवार…

परळीमध्ये सहानुभूती निर्माण करण्यचा प्रयत्न केला. पण मला वाटत नाही अशा गोष्टींमुळे जनतेला काही फरक पडतो. आणि तेच जनतेनं दाखवून दिलं. त्या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी ते दिसून येत होतं. काही जिल्ह्यांचं वैशिष्ट्य असतं की जर त्यांनी परिवर्तन करण्याचं ठरवलं, तर ते हात आखडता घेत नाहीत. ते या निवडणुकीत दिसून आलं.


हेही वाचा – ताईचा पराभव झाला आणि दादा जिंकला; परळीत धनंजय मुंडे विजयी

दिवाळीनंतर पक्षाचं संमेलन बोलवणार

दरम्यान, दिवाळी झाल्यानंतर पक्षाचं एक संमेलन बोलवणार असल्याचं शरद पवारांनी यावेळी सांगितलं. ‘जे आमदार निवडून आले, जे उमेदवार होते आणि त्यांच्यासोबतच ज्यांनी कुणी या निवडणुकीत काम केलं, त्या सगळ्यांशी जयंत पाटील या संमेलनात चर्चा करतील’, असं शरद पवारांनी यावेळी जाहीर केलं.

- Advertisement -

‘शिवसेनेला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही’

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देऊन भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यात यशस्वी ठरू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, ‘जनतेनं आम्हाला विरोधात बसण्याचा हुकूम दिला आहे. इतरांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही’, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -