घरमहाराष्ट्रअजित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगणार? राष्ट्रवादीचा मुख्यंमत्रीपदावर दावा नाही

अजित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगणार? राष्ट्रवादीचा मुख्यंमत्रीपदावर दावा नाही

Subscribe

पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहणार, राष्ट्रवादीकडून संकेत

राज्याचे मुख्यमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरणार की पाच वर्ष एकाच पक्षाचा मुख्यमंत्री राहणार, यावर आतापर्यंत सस्पेन्स होता. मात्र काल रात्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्रीपदाबाबतचे चित्र स्पष्ट झाले. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, “पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असून मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील.” राष्ट्रवादीच्या या नव्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे.

२००४ साली हुकली होती मुख्यमंत्रीपदाची संधी

काँग्रेसपासून फारकत घेत शरद पवारांनी १९९९ साली राष्ट्रवादीची स्थापना केली होती. पुढील काही महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी – काँग्रेसने आघाडी करत राज्यात सरकार स्थापन केले होते. काँग्रेसचे जास्त आमदार असल्यामुळे विलासराव देशमुख त्यावेळी मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर २००४ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या काँग्रेसपेक्षा जास्त जागा निवडून आल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी चालून आली होती. मात्र शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदा ऐवजी राज्यात आणि केंद्रात जादाची कॅबिनेट मंत्रीपदे पदरात पाडून घेतली. त्यानंतर २००९ साली पुन्हा काँग्रेसच्याच जास्त जागा निवडून आल्या, त्यामुळे त्यांचाच मुख्यमंत्री झाला.

- Advertisement -

यावेळी मात्र परिस्थिती वेगळी होती. शिवसेनेने भाजपासून फारकत घेतल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसशिवाय त्यांना पर्याय नव्हता. राष्ट्रवादीने काँग्रेस आणि शिवसेनेशी संवाद साधून सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी सुरुवातीपासून राष्ट्रवादीच्या गोटातून प्रयत्न केले जात होते. मात्र सत्ता स्थापनेच्या अखेरच्या टप्प्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाच वर्ष राहणार, अशी कबुली आता राष्ट्रवादीकडूनच देण्यात येत आहे. त्यामुळे २००४ नंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची मुख्यमंत्री पदाचे स्वप्न भंगले, असे दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -