तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केल्यामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांच्या विरोधात आव्हान उभे राहिले आहे. या मतदारसंघात महाडेश्वर विरुद्ध सावंत असा समान रंगला असताना आता विश्वनाथ महाडेश्वर यांनी बंडखोरांना शिवसैनिक घरी पाठवणार, असा विश्वास व्यक्त करत तृप्ती सावंत यांच्यावर टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट विचारामुळे बंडखोरांना शिवसैनिक घरी पाठवणार असे म्हणत आपण नक्कीच निवडून येणार असे महाडेश्वर यावेळी म्हणालेत. उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून, सर्वच उमेदवारांना धाकधूक लागली आहे.
मतदारच बंडखोरांना सडेतोड उत्तर देईल!
मतदारच बंडखोरांना सडेतोड उत्तर देईल!
आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 23, 2019
शिवसेनेच्या ९० जागा येणार
दरम्यान, एक्झिट पोलवर विश्वनाथ महाडेश्वर यांना विचारले असता त्यांनी महायुतीचे सरकार येणार हे निश्चित असून, शिवसेना ९० च्या वर जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले.
हेही वाचा –
रावसाहेब दानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक