घरमहाराष्ट्रकसं आहे उद्धव ठाकरेंच्या शपथविधीचं स्टेज? शिवशाही थीममध्ये आहे बांधकाम!

कसं आहे उद्धव ठाकरेंच्या शपथविधीचं स्टेज? शिवशाही थीममध्ये आहे बांधकाम!

Subscribe

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी शिवाजी पार्कवर शिवशाही थीममध्ये स्टेज उभारण्यात येत असून त्यासाठी ६ हजार स्क्वेअर फुटांचं बांधकाम करण्यात आलं आहे.

दादरच्या शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असून प्रसिद्ध कला-दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्यावर सोहळ्याचं स्टेज आणि संपूर्ण मैदानाच्या सजावटीची जबाबदारी आहे. या सोहळ्यासाठी देसाई यांनी भव्य असं स्टेज उभारलं असून मैदानात देखील त्याच पद्धतीची व्यवस्था लावण्यात आली आहे. शिवशाहीची थीम शिवाजी पार्कवरच्या स्टेजसाठी उभारण्यात आली असून साधारणपणे १०० लोकं बसू शकतील इतका भव्य स्टेज बांधण्यात आलं आहे. संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून ठाकरे कुटुंबातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्री होत असल्यामुळे त्याची उत्सुकता सगळीकडेच असल्याचं पाहायला मिळत आहे.

काय आहे स्टेजचं वैशिष्ट्य?

शिवाजी पार्कवर सुमारे ६० हजार लोकं बसू शकतील, अशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आली आहे. मैदानाच्या बाहेर देखील ठिकठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहेत. शिवाजी महाराजांचा एखादा किल्ला असावा, त्याप्रमाणे शिवाजी पार्कवरच्या स्टेजची उभारणी करण्यात येत आहे. प्रत्यक्ष या स्टेजवर देखील सुमारे १०० लोकं बसू शकतील इतकं हे भव्य स्टेज आहे. स्टेजवर छत्रपतींची राजमुद्रा लावण्यात आली आहे. त्यासोबतच शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला एक पुतळा देखील स्टेजवर आहे. स्टेजवर मागच्या बाजूला १२० बाय २० फुटांची एलईडी स्क्रीन देखील लावण्यात आली आहे. ६ हजार स्क्वेअर फुटांच्या या स्टेजच्या पुढच्या बाजूला किल्ल्याच्या बुरुजांप्रमाणे नक्षीकाम करण्यात आलं आहे.

शिवतीर्थावर अशा पद्धतीचं स्टेज निर्माण केलं जातं, तेव्हा ती आपल्यासाठी एक वेगळीच भावनिक गोष्ट असते. त्याच दृष्टीनं हे स्टेज उभं करण्याचा प्रयत्न आहे.

नितीन चंद्रकांत देसाई, कलादिग्दर्शक

- Advertisement -

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवेळीच त्यांच्या मंत्रीमंडळातील काही मंत्री देखील शपथ घेणार आहेत. त्यामध्ये शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई हे मंत्रिपदाची शपथ घेणार असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील काही आमदार देखील मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.


हेही वाचा – शपथविधीसाठी शिवाजी पार्कवर ‘सातरंगी’ व्यवस्था!

#LIVE : उद्धव ठाकरेंच्या शपथविधीपूर्वी काय घडतंय शिवाजी पार्कवर?

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ನವೆಂಬರ್ 27, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -