काँग्रेस-राष्ट्रवादीची सहा तास बैठक; उद्या पुन्हा बैठक सत्र

बैठकीतून मल्लिकार्जून खर्गे, छगन भुजबळ, जयराम रमेश, सुप्रिया सुळे बाहेर पडले आहेत. लवकरच ही बैठक संपेल, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. मात्र, उद्या सकाळी पुन्हा बैठक सत्र सुरु होणार आहे.

six hour meeting between congress and ncp leaders
काँग्रेस-राष्ट्रवादीची सहा तास बैठक; उद्या पुन्हा बैठक सत्र

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची दिल्लीत शरद पवार यांच्या ‘६ जनपथ’ या निवासस्थानी संध्याकाळी पाच वाजेपासून बैठक सुरु आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेच्या फॉर्म्युल्या संदर्भात अतिशय महत्त्वाची चर्चा सुरु आहे. बैठकीत किमान समान वाटपाबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सुमारे ६ तासांपासून चर्चा सुरु आहे. या बैठकीतून आता मल्लिकार्जून खर्गे, छगन भुजबळ, जयराम रमेश, सुप्रिया सुळे बाहेर पडले आहेत. लवकरच ही बैठक संपेल, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. मात्र, उद्या सकाळी पुन्हा बैठक सत्र सुरु होणार आहे.


हेही वाचा – उद्धव ठाकरेच होणार मुख्यमंत्री? संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य


उद्या सकाळी दहा वाजेपासून बैठक सत्र

उद्या सकाळी दहा वाजता दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेच्या फॉर्म्युलाबाबत आता चर्चा सुरु झालेली आहे. यापैकी किमान समान कार्यक्रम याबाबत तिनही पक्षांचे एकमत झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. आता फॉर्म्युलाच्या चर्चेत शिवसेनेशी देखील समन्वय साधले जाणार आहे. या फॉर्म्युल्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून प्रस्ताव बनवले जाण्याची शक्यता आहे आणि याबाबत शिवसेनेला देखील माहिती दिली जाणार आहे. दरम्यान, आज रात्री किती वेळ ही चर्चा सुरु राहते आणि त्यात काय निर्णय घेतला जातो, यावर उद्याच्या बैठका अवलंबून आहेत.


हेही वाचा – पेढ्यांची ऑर्डर गेली असं समजा – संजय राऊत


संजय राऊत पवारांची भेट घेण्याची शक्यता

दरम्यान, थेड्या वेळापूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण दिल्लीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्व घडामोडीबाबत माहिती देत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कदाचित संजय राऊत आज रात्री शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीत काय निर्णय घेतला गेला, याबाबत ही बैठक होण्याची शक्यता आहे. ही भेट कदाचित उद्याही होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.