आगे आगे देखो होता है क्या – सुप्रिया सुळे

'येत्या पाच वर्षात जे होईल ते चांगल्यासाठीच होणार आहे. त्यामुळे पुढील ५ वर्षात सकारात्मक बदल होईल. त्यामुळे 'आगे आगे देखो होता है क्या', असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

‘येत्या पाच वर्षात जनतेच्या मनातला महाराष्ट्र आम्ही घडवणार आहे. तसेच जे होईल ते चांगल्यासाठीच होणार आहे. त्यामुळे पाच वर्षात सकारात्मक बदल होईल. त्यामुळे ‘आगे आगे देखो होता है क्या’, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. आज राज्यातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार असून त्यांच्या स्वागतासाठी सुप्रिया सुळे सकाळीच विधानभवनात दाखल झाल्या.

आमदारांनी ऐक्य दाखवले

‘गेल्या एक महिन्यांपासून आमदारांच्या मनातील संघर्ष सुरु होता. त्यामुळे त्यांची काय मनस्थिती आहे हे मी समजू शकते. मात्र, अशा परिस्थित देखील त्यांनी ऐक्य दाखवले आहे. आज मी या नवनिर्वाचित आमदारांचे स्वागत करण्यासाठी आले आहे. तसेच आज महाराष्ट्रासमोर अनेक आव्हान आहे. त्यामुळे महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज आहे. त्याप्रमाणे पुढील पाच वर्षात जनतेच्या मनातला महाराष्ट्र निर्माण करु. त्यासाठी जे लागतील ते कष्ट करु, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. तसेच ‘महाराष्ट्राच्या जनतेची सेवा ही एकच गोष्ट आमच्या मनात आहे, असेही यावेळी त्यांनी म्हटले आहे. विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना विरोधातील आवाज दाबण्याचे काम आम्ही कधी करणार नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. तसेच पवार कुटुंबात कोणतेही मतभेद नसून सगळे काही ठीक आहे, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील सत्ता स्थापनेचा अखेर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सत्तेचा तिढा सुटला. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची आघाडी स्थापन करण्यात येत असून, आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनतील. त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार असल्याची माहिती शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिली आहे.


हेही वाचा – उद्धव बाळ ठाकरे मुख्‍यमंत्री