घरमहाराष्ट्रकोथरुड आलं पण कोल्हापूर गेलं!

कोथरुड आलं पण कोल्हापूर गेलं!

Subscribe

कोल्हापूरच्या बाबतीत महायुतीला कोथरुड आलं पण कोल्हापूर गेलं असाच अनुभव येत आहे.

गड आला पण सिंह गेला! ही मराठीतील म्हण आपणा सर्वांना ज्ञातच आहे. पण खऱ्या अर्थाने या म्हणीचा अनुभव सध्या महायुतीला येत आहे. त्याचे झाले असे की, आज राज्यात महायुतीने विजय मिळवला असला तरी कोल्हापूरमध्ये मात्र महायुतीची निराशाजनक कामगिरी झाल्याचे निकालावरून दिसते. विशेष म्हणजे कोल्हापूरचे रहिवासी असलेले चंद्रकांत पाटील यांनी यंदा कोथरुडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यात ते जवळपास यशस्वी झाले आहेत. पण कोल्हापूरमध्ये मात्र अपक्षांसह विरोधकांनी महायुतीला धूळ चारल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या बाबतीत महायुतीला कोथरुड आलं पण कोल्हापूर गेलं असाच अनुभव येत आहे.

हेही वाचा – लातूरमध्ये देशमुख बंधू विजयाच्या वाटेवर!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरुड येथून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय सार्थकी ठरवत चंद्रकांत पाटील यांना कोथरुड विधानसभा मतदारसंघात १ लाख १ हजार ९४३ मतं पडली. त्यांना मनसेच्या किशोर शिंदे यांनी उत्तम लढत दिली. किशोर शिंदे यांना ७६ हजार ६९६ पडली आहेत. असे असले तरी चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांना विजय संपादन करण्यात यश मिळवून देता आलेले नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढले. त्यावेळी कोल्हापूरमध्ये शिवसेनेने ६ जागांवर तर भाजपने दोन जागांवर विजय संपादन केला होता. तर उर्वरित दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले होते. पण २०१९ विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेनेने महायुतीची घोषणा केली. त्यानुसार जागावाटपसुद्धा करण्यात आले. पण महायुतीला कोल्हापूरचे गणित यंदा सोडवता आलेले नाही. कोल्हापूरचा राधानगरी विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित ९ विधानसभा मतदारसंघात महायुती पराभवाच्या वाटेवर आहे.

- Advertisement -

विधानसभा मतदारसंघ    उमेदवाराचे नाव     पक्ष       मतं

कोथरुड – चंद्रकांत पाटील – भाजप – १ लाख १ हजार ९४३
किशोर शिंदे – मनसे – ७६ हजार ६९६

चंदगड – राजेश पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस – ५४ हजार ८५१
शिवाजी पाटील – अपक्ष – ५० हजार ९२०

- Advertisement -

राधानगरी – प्रकाश आनंदराव आबिटकर – १ लाख ४ हजार ८४५
के. पी. पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस – ८६ हजार ५६६

कागल – हसन मुश्रीफ – राष्ट्रवादी काँग्रेस – १ लाख १४ हजार २००
समरजीत सिंग घाटगे – अपक्ष – ८७ हजार ३२३

कोल्हापूर दक्षिण – रुतूराज पाटील – काँग्रेस – १ लाख ४० हजार १०३
अमल महाडिक – भाजप – ९७ हजार ३९४

करवीर – पी. एन. पाटील – काँग्रेस – १ लाख ३४ हजार ७९०
शशीकांत नरके – शिवसेना – १ लाख १२ हजार १९८

कोल्हापूर उत्तर – चंद्रकांत पंडीत जाधव – काँग्रेस – ९० हजार ४६०
राजेश विनायक क्षिरसागर – शिवसेना – ७५ हजार ५००

शाहूवाडी – डॉ. विनय विलासराव कोरे – जन सुराज्य शक्ती – १ लाख २३ हजार ९७३
सत्यजीत पाटील – शिवसेना – ९६ हजार २७४

हातकणंगले – राजू आवाळे – काँग्रेस – ६९ हजार ५७९
डॉ. सुजित मिणचेकर – शिवसेना – ५९ हजार ७९४

इचलकरंजी – प्रकाश अवाडे – अपक्ष – १ लाख १६ हजार ५२३
सुरेश हळवणकर – भाजप – ६६ हजार ८६३

शिरोळ – राजेंद्र पाटील – अपक्ष – ९० हजार ३८
उल्हास संभाजी पाटील – शिवसेना – ६२ हजार २१४

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -