घरमहाराष्ट्रराज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची दाट शक्यता

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची दाट शक्यता

Subscribe

राष्ट्रवादी पक्षाला राज्यपालांकडे आज संध्याकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सोमवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले. यासाठी राष्ट्रवादीला २४ तासांची मुदत देखील देण्यात आली. त्यामुळे सत्ता मिळवायची असेल तर आज रात्री साडे आठ वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला १४५ आमदारांचा पाठिंबा असल्यचा दावा राज्यपालांसमोर सिद्ध करता यायला हवे. राष्ट्रवादीला राज्यपालांकडे आज संध्याकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. दरम्यान, राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या जलद गतीने घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक सुरु आहे. यासोबतच काँग्रेसच्या नेत्यांच्या देखील मुंबईत बैठका सुरु आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांचे एकमत झाल्यानंतर ते शिवसेनेकडे जातील, अशी चर्चा सुरु आहे.


हेही वाचा – #Live : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची राज्यपालांकडे शिफारस

- Advertisement -

 

राज्यपालांकडून तीन पक्षांना सत्ता स्थापनेची संधी

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन १९ दिवस निघून गेले आहेत. मात्र, तरीही राज्यात कोणत्याही पक्षाकडून सत्ता स्थापन होऊ शकलेली नाही. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी गेल्या पाच वर्षातील भजप-शिवसेना सरकारचा कार्यकाळ संपुष्टात आला. ९ नोव्हेंबरपर्यंत राज्यात सत्ता स्थापन होणे गरजेचे होते. मात्र, भाजप-शिवसेनेचे बिनसल्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा पेच वाढत गेला. अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नियमानुसार सर्वाधिक जागा निवडून आलेल्या भाजप पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले. यासाठी राज्यपालांकडून भाजपला ४८ तासांची मुदत देण्यात आली होती. भाजप आणि शिवसेना यांनी निवडणुकीपूर्वी युती जाहीर केली होती. मात्र, निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांमधील मतभेद टोकाला गेले. अखेर शिवसेनेची मनधरणी करण्यात भाजपला अपयश आले आणि भाजपने सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेतून माघार घेतली. भाजप सत्ता स्थापनेत यशस्वी न झाल्यामुळे राज्यपालांनी राज्यातील सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणजे शिवसेना पक्षाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले. यासाठी राज्यपालांकडून २४ तासांची मुदत देण्यात आली होती. मात्र, २४ तासांत शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करु शकली नाही. शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करु शकली नाही म्हणून राज्यपालांनी नियमानुसार थर्ड लार्जेस्ट पार्टी ठरलेल्या राष्ट्रवादी पक्षाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात राष्ट्रपती राजवट? राज्यापालांचा वेळ वाढवून देण्यास नकार!


सत्ता स्थापनेसाठी कमी वेळ मिळाल्याने शिवसेना कोर्टात जाणार?

दरम्यान, सोमवारी शिवसेनेने राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी अधिक वेळ मागितला होता. मात्र, राज्यपालांनी वेळ वाढवण्यास नकार दिला. त्यामुळे शिवसेना राज्यपालांच्या निर्णयावर नाराज आहे. सोमवारी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत शिवसेनेला राज्यपालांकडून कमी वेळ मिळाला असल्याचा खेद त्यांनी व्यक्त केला होता. राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी कमी वेळ दिला, असा आरोप शिवसेनेकडून होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना कोर्टात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -