घरमहाराष्ट्रकेजमध्ये होणार तिरंगी लढत

केजमध्ये होणार तिरंगी लढत

Subscribe

२०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये केज विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुसर्‍यांदा नमिता मुंदडा या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील भाजपकडून संगीता ठोंबरे यांच्याच नावाची चर्चा पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते आहे. विशेष म्हणजे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी सुद्धा बहुजन वंचित आघाडीकडे तिकिटासाठी मागणी केली आहे.

राज्यातील एक महत्वाचा आणि बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. 1962 पासून आतापर्यंत म्हणजे एकूण तेरा विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने पाच वेळा राष्ट्रवादी काँग्रेसने चार वेळा आणि भाजपने तीन वेळा तर अपक्षाने एक वेळा या मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. 1990 पासून 2009 पर्यंत या मतदारसंघातून विमल मुंदडा या दोन वेळा भाजपकडून तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस करून सलग पाच वेळा निवडून गेल्या होत्या. 2012 साली डॉ. विमल मुंदडा यांचे दीर्घ आजाराने मृत्यू झाला. सलग पाच वेळा आमदारकी घरात असलेल्या मुंदडा कुटुंबीयांसाठी 2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून मात्र आमदारकीपासून फारकत घ्यावी लागली.

- Advertisement -

कारण 2014 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संगीता ठोंबरे या भाजपकडून पुन्हा एकदा उमेदवार म्हणून पुढे आल्या. यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून कडून विमल मुंदडा यांच्या सुनबाई आणि अक्षय मुंदडा यांच्या पत्नी नमिता मुंदडा यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले होते. 2014 च्या निवडणुकीमध्ये भाजपच्या संगीता ठोंबरे यांना एक लाख सहा हजार 834 मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवख्या उमेदवार असलेल्या नमिता मुंदडा यांना 64,113 मते मिळाली.

केज विधानसभा मतदारसंघांमध्ये अंबाजोगाई आणि केज या दोन मोठ्या शहरांचा समावेश होतो, तुलनेने मोठ्या असलेल्या अंबाजोगाई शहरातले प्रश्न मात्र मागच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. लोकसभेत केज विधानसभा मतदार संघात प्रीतम मुंडे यांना 1 लाख 16 हजार तर होमपिच असलेल्या राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांना 95 हजार 293 मतं पडली. म्हणजेच लोकसभा निवडणुकीत केज विधानसभा मतदारसंघात भाजपाला वीस हजार मतांची आघाडी मिळाली. विशेष म्हणजे राखीव असलेल्या केज विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तब्बल एकवीस हजार मते मिळाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -