घरमुंबईमहाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग; दोन अपक्ष आमदार पोहोचले मातोश्रीवर

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग; दोन अपक्ष आमदार पोहोचले मातोश्रीवर

Subscribe

विधानसभा निवडणुकीत एकूण १३ अपक्ष आमदार निवडून आले आहेत. त्यापैकी रामटेकमधून निवडून आलेले अपक्ष आमदार आशिष जैसवाल आणि भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र गोंडेकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे दोन्ही पक्ष सत्ता स्थापन करण्यासाठी एकमेकांची मदत घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र, सत्ता स्थापन केल्यानंतर  बरोबरीचा वाटा मिळावा यासाठी यासाठी दोन्ही पक्षांनी आपला आमदारांचा आकडा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी दोन अपक्ष आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

हेही वाचा – ‘उतणार नाही मातणार नाही’; गोपीनाथ गडावर धनंजय मुंडेंची प्रार्थना

- Advertisement -

‘अपक्ष असलो तरीही शिवसेनेलाच पाठिंबा’

विधानसभा निवडणुकीत एकूण १३ अपक्ष आमदार निवडून आले आहेत. त्यापैकी रामटेकमधून निवडून आलेले अपक्ष आमदार आशिष जैसवाल आणि भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र गोंडेकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या आमदारांनी शिवसेनेला आपला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. या दोन्ही आमदारांना शिवसेनेने पक्षात येण्याची ऑफर केल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या अपक्ष आमदारांनी आम्ही अपक्ष लढलो असलो तरी आमचा पाठिंबा शिवसेनेला आहे, असे ते म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -