घरमहाराष्ट्रशरद पवार पोटनिवडणुकीला उभे राहिले तर... आणि उदयनराजेंना अश्रू अनावर

शरद पवार पोटनिवडणुकीला उभे राहिले तर… आणि उदयनराजेंना अश्रू अनावर

Subscribe

साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत प्रश्न विचारले असता अश्रू अनावर झाले. उदयनराजे यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. याशिवाय त्यांनी साताऱ्याच्या खासदारकीचा देखील राजीनामा दिला. मंगळवारी सातारा लोकसभा मतादारसंघाच्या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली. यासंदर्भात उदयनराजे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद बोलवली. या पत्रकार परिषदेत उदयनराजे यांना शरद पवार यांच्याबाबत प्रश्न विचारले असता त्यांना गहिवरुन आले.

- Advertisement -

‘शरद पवार कालही आदरणीय होते, आजही आहेत आणि उद्याही असणार’ असे उदयनराजे म्हणाले. याशिवाय ‘सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीला जर शरद पवार उभे राहतील तर मी फॉर्म भरणार नाही’, असे उदयनराजे म्हणाले. यावेळी उदयनराजेंना अश्रू अनावर झाले. निवडणूक आयोगाने शनिवारी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची तारिख जाहीर केली. मात्र त्यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीविषयी माहिती जाहीर झाली नव्हती. मंगळवारी निवडणूक आयोगाने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले. या प्रसिद्धीपत्रकात सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकी संदर्भात माहिती देण्यात आली आहे. ही पोटनिवडणूक देखील २१ ऑक्टोबरला होईल आणि २४ ऑक्टोबरला मतमोजनी केली जाईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

साताऱ्यात शरद पवार यांची मोर्चेबांधणी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तोडाफोडीचे राजकारण केले. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यांना आपल्याकडे आकर्षित केले. यामध्ये उदयनराजे भोसले हे देखील मोठे नाव. उदयनराजे यांचे साताऱ्याच चांगले प्रभुवत्व आहे. याशिवाय आतापर्यंत त्यांचा साताऱ्यात एकदाही पराभाव झालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना उदयनराजेंना भाजपात चाणक्य नितीने सामील करण्यात यश आले. मात्र, उदयनराजे भाजपातच राहतील की राष्ट्रवादीत पुन्हा सामील होतील? हे येत्या काळात दिसेलच. सध्यस्थिती पाहता साताऱ्यात शरद पवार निवडणुकीला उभे राहिले तर भाजपचे साताऱ्याच्या जागेचे स्वप्न पुन्हा भंग होऊ शकते. दरम्यान, सातारा पोटनिवडणुकीच्या जागेसाठी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश पाटील यांची देखील नावे उदयनराजेंच्या विरोधात लढण्यासाठी चर्चेत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ठरलं, उदयनराजे यांची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -