होय, मी सत्तेसाठीच युती केली – उद्धव ठाकरे 

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'सामना' वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी शिवसेना आणि भाजप युती संदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर परखडपणे उत्तरे दिले.

Uddhav thackeray slams rahul gandhi on garibi hatao slogan
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन

‘होय, मी सत्तेसाठीच युती केली. त्यात लपवण्यासारखे काही नाही’, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ वृत्तपत्राला मुलाखत दिली. राज्यसभेचे खासदार आणि ‘सामना’ वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी युती संदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर ठामपणे भूमिका मांडली. युतीत शिवसेनेला आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक कमी जागा मिळाल्या आहेत. तरीही शिवसेनेने युती का केली? अस प्रश्न जनमान्यांना पडत आहे. याच प्रश्नांशी संबंधित प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला असता त्यांनी सत्तेसाठीच आपण युती केल्याची कबुली दिली.

हेही वाचा – भुसावळमध्ये भाजप नगरसेवकाच्या कुटुंबावर गोळीबार; पाच जण ठार

निवडणुकीसाठी १६४ मतदारसंघात शिवसेनेचे कार्यकर्ते तयार आहेत – उद्धव ठाकरे

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध ताणले गेले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप पक्षांची युती होईल का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, दोन्ही पक्षांनी आपले मतभेद दूर सारुन आपापल्या गरजेनुसार युतीची घोषणा केली. दरम्यान, जागा वाटपाच्या निर्णयावरुन शिवसेना नाराज असल्याचे बोलले जात आहे. कारण शिवसेनेला १२६ जागा हव्या होत्या. मात्र, वाटाघाटीच्या चर्चांमध्ये शिवसेनेला १२४ जागांवर समाधान मानावे लागले. यासंदर्भात संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘आता असं आहे की, १६४ ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते तयार आहेत. तसे १२४ ठिकाणी भाजपचेही आहेत. म्हणून युतीत काही कमवताना काही गमावावे लागते. पण शेवटी एकत्र निकाल बघितल्यानंतर आपण कुठे आहोत हे कळते. मी म्हटले ना, सत्ता आपल्याला हवी आहेच. होय, मी सत्तेसाठीच युती केली. त्यात लपवण्यासारखे काही नाही. परंतु ही सत्ता असेल तर त्या १६४ मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनासुद्धा मी काही ना काही देऊ शकतो. म्हणून मी युती केली.’ त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकाला बसवून दाखवतोच, असे वचन आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.