वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर

प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

prakash ambedkar
प्रकाश आंबेडकर

विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत २२ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. जागा वाटपाबाबत प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसी यांची मते न जुळल्यामुळे दोघांनी विभक्तपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमने आतापर्यंत दोन याद्या जाहीर केल्या असून यात फक्त सात उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत तर वंचित बहुजन आघाडीने पहिल्याच यादीत २२ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.


हेही वाचा – शरद पवार पोटनिवडणुकीला उभे राहिले तर… आणि उदयनराजेंना अश्रू अनावर