घरफिचर्सकुणी, हात देता का रे? हात ?

कुणी, हात देता का रे? हात ?

Subscribe

कुणी, हात देता का रे? हात ?
एका असहायाला कुणी हात देता का?

कार्यकर्त्यांवाचून,
पक्षनिधी वाचून,
जनतेच्या मतांवाचून
निवडणूक आयोगाच्या दये वाचून,
देश-परदेश हिंडत आहे.
जिथून कधी हरणार नाही,
अशी जागा ढूंढत आहे,
कुणी, हात देता का रे? हात ?

- Advertisement -

काय रे बाळा, खरच सांगतो बाबांनो
हात आता थकून गेलेत,
निवडणुकीच्या धुरळ्यात,प्रचारांच्या रेट्यात
अर्ध-अधिक तुटून गेलय,
सत्ताधार्‍यांच्या लाटांवरती,
मित्रपक्षांच्याच जाळावरती,
झेप झुंज घेऊन घेऊन,
हात आता थकून गेलेत.

जळके तूटके पंख पालवित,
खुरडत खुरडत उडत आहे,
खर सांगतो बाबांनो,
हाताला हाताच नडतायत रे,
हे.. बाबा.. कुणी हात देता का ? हात ?

- Advertisement -

आम्हाला वाढीव सीट नको,
मुख्यमंत्रीपदाची खुर्ची नको,
जयजयकार नको, पद नको,
एक हवा फक्त आधार
पंख मिटुन पडण्यासाठी,
एका खुर्चीचं तेवढ बघा
आम्हाला बसण्यासाठी,
जमल्यास पक्षकार्यालय राहू द्या
राहिलेल्या कार्यकर्त्यांसाठी
कुणी हात देता का रे? हात ?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -