अगदी पूर्वीपासून गूळ, शेंगदाणे खाणं आरोग्यासाठी खूप लाभदायी मानलं जातं.
पूर्वीचे लोक गूळ, शेंगदाण्याकडे पौष्टिक आहार म्हणून पाहायचे.
गूळ, शेंगदाणे खाल्ल्याने अन्न पचण्यास मदत होते.
तसेच यामुळे अशक्तपणा आणि थकवादेखील दूर होतो.
गूळ आणि शेंगदाणे एकत्र खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात.
शेंगदाणे आणि गूळ खाण्यामुळे शरीरातील रक्ताची कमी दूर होते.
शेंगदाणे आणि गुळाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.