अभिनेत्री श्वेता तिवारी हिने मालिका, सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

श्वेता तिवारी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

आता देखील अभिनेत्री एका 33 वर्षीय अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

ज्या अभिनेत्यासोबत श्वेता हिच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती तो अभिनेता  फहमान खान आहे.

श्वेता तिवारी 43 वर्षांची, तर फहमन खान 33 वर्षांचा आहे. दोघांच्या वयात  10 वर्षांचा फरक आहे.

फहमनने एका मुलाखतीत यावर प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाला श्वेता तिवारीसोबतच्या माझ्या डेटिंगच्या अफवांवर खूप हसलो.

त्यानंतर फहमनने श्वेता तिवारीला फोन केला आणि दोघेही या अफवांवर खूप हसले.

फहमनचे नाव अनेकदा कोणाच्या ना कोणाशी जोडले जाते. यावर अभिनेता म्हणाला 'मला काही फरक पडत नाही.'

'अभिनेता असल्यामुळे माझ्याबद्दल चर्चा रंगणार मला माहिती आहे  ज्यावर मी स्पष्टीकरण देऊ शकत नाही'

पुढे श्वेताचं कौतुक करत म्हणाला, ‘मेरे डॅड की दुलहन’ दरम्यान मला तिच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आहे.