रविवारसकट आठवड्यात तुम्ही 90 तास काम करा, असे वक्तव्य लार्सन ऍंड टुब्रोचे प्रमुख एस.एन. सुब्रमण्यन यांनी नुकतेच केले. त्यावरून सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

दोन वर्षांपूर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्याला 70 तास काम करा, असे म्हटले होते.

इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या (ILO) 2024 च्या आकडेवारीनुसार, जगभरातील ज्या देशात कामाचे तास जास्त आहेत, त्यात भारताचा समावेश होतो.

दक्षिण आशियातील देशांमध्ये देखील भारत हा सर्वाधिक तास काम करणाऱ्या लोकांचा देश आहे.

आयएलओच्या डेटानुसार, भारतीय दर आठवड्याला सरासरी 46.7 टक्के काम करतात. 

विशेष म्हणजे यातील टिप्पणीनुसार, 51 टक्के भारतीय दर आठवड्याला 49 तासांपेक्षा जास्त वेळ काम करतात.

सर्वाधिक तास काम करणाऱ्यांच्या यादीत भूतानचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. 

भूतानमध्ये 61 टक्के कामगार दर आठवड्याला 49 तासांपेक्षा जास्त तास काम करतात. 

या तुलनेत बांगलादेश तसेच पाकिस्तानातील अनुक्रमे 47 आणि 40 टक्के कामगार आठवड्याला 49 तासांपेक्षा जास्त तास काम करतात. 

ILO च्या आकडेवारीनुसार, भूतान आणि यूएई येथील कर्मचारी एकूणच जास्त तास काम करतात.