दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत दाखल प्रतिज्ञापत्रानुसार ते करोडपती आहेत.
विशेष म्हणजे, त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या नावावर अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षाही अधिक संपत्ती अथवा मालमत्ता आहे.
अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पत्नीची एकूण मालमत्ता 4.23 कोटी रुपये एवढी आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटल्यानुसार, त्यांची एकूण संपत्ती 1.73 कोटी रुपये एवढी आहे.
त्यांच्याकडे 1.7 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तसेच, त्यांच्या नावावर कुठलेही घर अथवा गाडी नाही.
अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता या आयआरएस अधिकारी होत्या. त्यांच्याकडे केजरीवाल यांच्या तुलनेत अधिक संपत्ती आहे.
सुनीता केजरीवाल यांची एकूण मालमत्ता 2.5 कोटी रुपये एवढी आहे. त्यांच्याकडे 1 कोटी रुपयांपेक्षाही अधिक किमतीची स्थावर मालमत्ता आहे.
सुनिता यांच्याकडे गुरुग्राममध्ये घर आहेत. तसेच त्यांच्या नावावर पाच सीटर गाडीही आहे.