अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या वणव्याने हाहाकार माजवला आहे.

या वणव्याचा फटका अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या घरांनाही बसला आहे. तर, हजारो लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत.

कॅलिफोर्नियाच्या जंगलातील या आगीने 29 हजार एकरपेक्षा जास्त क्षेत्राला वेढले आहे.

आगीत आतापर्यंत 10 हजारांपेक्षा हून अधिक इमारती पूर्णपणे भस्मसात झाल्या आहेत.

या आगीने हॉलिवूड हिल्स आणि त्याच्या आसपासच्या परिसरालाही वेढले असल्याची माहिती आहे.

वणव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉस एंजेलिस अग्निशमन दलाला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने आग विझवावी लागत आहे.

लॉस एंजेलिसमधील हॉलीवूड हिल्सपर्यंत सर्वत्र जंगलात आगीचा दाट धूर पसरल्याचं चित्र दिसून येत आहे.

या आगीमुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो लोक बेघर झाले आहेत.

प्रशासनाने सुमारे 50 हजार लोकांना तात्काळ घरे रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.