महाराष्ट्र राज्याची आर्थिक राजधानी आणि भारतातील सर्वाधिक लोकसंख्या  असलेले शहर म्हणून मुंबईची ओळख आहे.

मुंबईमध्ये विदेशी पाहुण्याच्या दृष्टिस्थानी पडणारे प्रथम दृश्य म्हणजे मुंबई एयरपोर्ट आणि त्या सभोवलचा परिसर.

मुंबई महापालिका मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि हरित शहर बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. 

मुंबईला हरित व सुंदर शहर बनविण्यात एअरपोर्ट प्राधिकरणाचा हातभार लागला आहे. 

यासाठी मुंबई एअरपोर्ट प्राधिकरणाने स्वच्छ,  सुंदर आणि हरित बनविण्यासाठी आपले बहुमूल्य योगदान दिले आहे.

उद्यान खाते पालिकेच्या मालमत्ता, जागा, उद्याने या ठिकाणी जास्तीत जास्त झाडे लावण्याचे काम करते.

मुंबईला हरित व सुंदर करणे ही फक्त महानगर पालिकेचीच जबाबदारी नसून इतर खासगी संस्थाचा मोलाचा सहभाग त्यासाठी अत्यावशक आहे.

उद्यान खात्याद्वारे अशा संस्थांसोबत बैठका घेवून त्यांना त्यांच्या कर्तव्याची व त्यांच्याकडून मुंबईसाठी अपेक्षित असलेल्या कामाची जाणीव करून देण्यात आली. 

मुंबई एयरपोर्ट, जे.एस. डब्लू, महिंद्रा, गोदरेज यासारख्या काही मोठ्या संस्थांच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी देखील त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मुंबईतील मोठमोठे भूखंड ताब्यात असलेल्या इतर खासगी जागा मालक, उद्योजक, संस्था, कंपन्या आदींनीही आपला सहभाग देणे अपेक्षित आहे.