हरमनप्रीत कौरच्या  नेतृत्वात बांग्लादेशविरुद्ध सिलहटमध्ये चौथा टी-20 सामना खेळला गेला.

हरमनप्रीत कौर 300 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी दुसरी भारतीय आणि जगातील पाचवी खेळाडू ठरली आहे.

माजी कर्णधार मिताली राजने 23 वर्षांच्या शानदार कारकिर्दीत सर्व फॉरमॅटमध्ये 333 सामने खेळले आहेत.

सुझी बेट्स (317 सामने), एलिस पेरी (314 सामने), शार्लोट एडवर्ड्स (309 सामने) यांचा या यादीत समावेश आहे.

चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाकडून आशा शोभनाने पदार्पण केले.

या सामन्यात आशा शोभनानेही एका नव्या विक्रमाची नोंद केली.

33 वर्षे आणि 51 दिवस वयाची आशा टी-20मध्ये पदार्पण करणारी  सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू ठरली.

हा विक्रम सीमा पुजारे हिच्या नावावर होता, तो आशा शोभनाने मोडला.

सीमा पुजाराने 32 वर्षे 50 दिवस वयात भारतीय संघाकडून टी-20 मध्ये पदार्पण केले होते.

डकवर्थ-लुईस पद्धतीने चौथ्या सामन्यात भारतीय महिला संघाने बांग्लादेशविरुद्ध  विजय मिळविला.