बॉलीवूडचा दबंग हीरो सलमान खानच्या वांद्रेस्थित घरावर रविवारी पहाटे दोन अज्ञातांनी गोळीबार केला

याप्रकरणी विकीसाहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल या आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने गुजरातमधून अटक केली

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून सलमानला गेल्या सहा वर्षांत पाच वेळा जीवे मारण्याची धमकी आणि प्रयत्न झाला

सलमानने काळवीटाची शिकार केली होती, ज्याची बिश्नोई समाजात पूजा केली जाते, हे कारण धमकीचे होते

लॉरेन्स बिश्नोईचा खास शूटर संपत नेहराने 2019मध्ये सलमानला मारण्याचा प्रयत्न केला होता

बंदुकीची रेंज कमी असल्याने नेहरा माघारी आला आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या

घराजवळील जॉगिंग पार्कमध्ये 2022 साली सलमानचे  वडील सलीम खान मॉर्निंग वॉकनंतर ज्या बाकावर बसतात, तिथे धमकीचे पत्र बिश्नोईने ठेवले होते

सलमान खानच्या मॅनेजरला लॉरेन्स आणि गोल्डी ब्रारचा खास मोहित गर्ग याने 2023मध्ये धमकीचा ईमेल पाठवला होता

पंजाबी गायक गिप्पी ग्रेवालला फेसबुकवरून धमकी देण्यात आली होती आणि त्यात सलमानचा उल्लेख होता