नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील सर्वाधिक धावपळीचा विमानतळ आहे. वर्षभरात येथून 7.22 कोटी प्रवाशांनी प्रवास केला.

2022 मध्ये नवी दिल्ली विमानतळ नवव्या स्थानी होता. यंदा तो दहाव्या स्थानावर आहे. कोरोनापूर्वी तर हा विमानतळ 17 व्या स्थानावर होता.

यादीतील पाच विमानतळ हे अमेरिकेतील आहेत. यात अटलांटा एअरपोर्ट पहिल्या क्रमांकावर आहे. येथून दरवर्षी जवळपास 10.46 कोटी प्रवासी उड्डाण करतात.

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. वर्षभरात येथून 8.69 कोटी प्रवाशांनी उड्डाण केले.

अटलांटापाठोपाठ अमेरिकेतील डलास-फोर्ट वर्थ, डेनवर, लॉस एंजलिस आणि शिकागो या विमानतळांचा यादीत समावेश आहे. 

लंडनमधील हिथ्रो विमानतळ या यादीत चौथ्या नंबरवर आहे. 

वर्षभरात टोकियो विमानतळाने चांगलीच प्रगती केली आहे. 2022 मध्ये हा विमानतळ 16 व्या क्रमांकावर होता, जो 2023 मध्ये थेट पाचव्या क्रमांकावर आला आहे.

ग्लोबल एअर ट्रॅफिकपैकी 10 टक्के ट्रॅफिक हा या सर्वाधिक धावपळीच्या विमानतळांचा असतो.

जगभरातील धावपळीच्या दहा विमानतळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात मुंबई विमानतळाचा समावेश नाही.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा यात 19.8 टक्क्यांची वाढ झाली आहे.