खासदार हेमा मालिनींबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांना भोवले आहे

खासदार हेमा मालिनी यांना भाजपाने मथुरा लोकसभा मतदारसंघातून तिकीट  दिले आहे

प्रचारादरम्यान महिलांचा अपमान करू शकत नाही, असा इशारा निवडणूक आयोगाने काँग्रेसला दिला होता

निवडणूक आयोगाने याप्रकरणी रणदीप सुरजेवाला यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती

भाजपाच्या आयटी सेलने संबंधित व्हिडिओ क्रॉप केल्याचा दावा रणदीप सुरजेवाला यांनी केला होता

सुरजेवाला यांना मंगळवार सायंकाळपासून दोन दिवस प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे

कोणतीही जाहीरसभा, मिरवणूक, रॅली, रोड शो आणि इतर उपक्रमांमध्ये सुरजेवाला यांना सहभागी होता येणार नाही.

निवडणुकीसंबंधित मुलाखती, प्रसार माध्यमांना निवेनन देण्यासही सुरजेवाल यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

काँग्रेस नेतृत्व अशा लोकांवर कारवाई का करत नाही, अशी प्रतिक्रिया खासदार हेमा मालिनी यांनी दिली होती

महिलांचा आदर कसा करायचा हे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिकायला हवे, असेही हेमा मालिनी म्हणाल्या होत्या.