Tiku Talsania : प्रसिद्ध अभिनेत्याला हृदयविकाराचा तीव्र झटका, प्रकृती गंभीर
70 वर्षीय टिकू तलसानिया यांना आज (11 जानेवारी) सकाळी हृदयविकाराचा
तीव्र झटका आला.
त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई
अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
टिकू तलसानिया यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
टिकू तलसानिया यांनी
1984 मध्ये टीव्ही शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
त्यांनी 1986 मध्ये 'प्यार के दो पल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.
चार दशकांच्या कारकिर्दीत टिकू तलसानिया यांनी
250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
टिकू तलसानिया यांनी आजपर्यंत विनोदी ते गंभीर अशा सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.
त्यांचे संवाद आणि विनोदी टायमिंग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
टिकू तलसानिया हे
‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ या चित्रपटात नुकतेच दिसले होते.
टिकू तलसानिया
यांच्या परिवाराबद्दल बोलायचे झाले तर त्यांना पत्नी आणि दोन मुले आहेत.
त्यांचा मुलगा रोहन तलसानिया हा संगीतकार असून त्याची मुलगी शिखा तलसानिया ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे.