रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  संघ मागील 17 वर्षांपासून पहिल्या आयपीएल ट्रॉफीची वाट पाहत आहे.

गेल्या काही वर्षांत आरसीबी संघात संतुलनाचा अभाव होता, पण यावर्षी तसे नाही.

यंदा आरसीबीने चांगले खेळाडू खरेदी करून आयपीएल 2025 साठी एक मजबूत संघ तयार केला आहे.

 यंदा संघात मोठे खेळाडू नसले तरी अनेक अष्टपैलू खेळाडू, चांगले गोलंदाज आणि फलंदाज संघाला चॅम्पियन बनवू शकतात.

आरसीबी संघाला चॅम्पियन बनवण्याची क्षमता असलेल्या 5 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया...

इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज फिल सॉल्टला आरसीबीने यंदा 11.50 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. तो संघाला चॅम्पियन बनवू शकतो.

युवा फलंदाज रजत पाटीदार हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो संघाला चॅम्पियन बनवू शकतो.

लियाम लिव्हिंगस्टोन  फिनिशर म्हणून ओळखला जातो. त्यामुले आरसीबीने त्याला 8.75 कोटींना खरेदी केले आहे.

अष्टपैलू फलंदाज टिम डेव्हिड यंदा आरसीबीमध्ये सामील झाला आहे. त्यांच्या कामगिरीवर आरसीबीचा विजय अवलंबून असेल.

स्विंग गोलंदाजीचा बादशाह भुवनेश्वर कुमार या हंगामात आपल्या शानदार गोलंदाजीने आरसीबीला चॅम्पियन बनवू शकतो.