आयपीएल 2025 चे  12 मार्चपासून आयोजन करण्यात आले आहे.

आयपीएलच्या यंदाच्या 18 व्या हंगामासाठी सर्व  फ्रँचायझींनी आपापले संघ तयार केले आहेत. 

यंदाच्या हंगामात 10 संघांपैकी 5 संघ नवीन कर्णधारासह मैदानात उतरताना पाहायला मिळतील. 

मागील हंगामात गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघ फार विशेष कामगिरी करू शकला नव्हता. 

अशा स्थितीत यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्स संघ नवीन कर्णधारासह मैदानात उतरू शकतो. 

पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरचा संघात समावेश केला आहे. त्यामुळे तो पंजाबचा कर्णधार होण्याची शक्यता आहे. 

श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्स संघातून बाहेर पडल्यामुळे व्यंकटेश अय्यर संघाचा कर्णधार होऊ शकतो.

दिल्ली कॅपिटल्सने लोकेश राहुल विकत घेतले आहे. त्यामुळे त्याच्याकडे संघाचे कर्णधारपद जाऊ शकते.

लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या कर्णधारपदासाठी ऋषभ पंत आणि निकोलस पूरन आघाडीवर आहेत. 

असे असले तरी पंत कर्णधार होऊ शकतो, कारण त्याला लखनऊ संघाने 27 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.