गेल्या वर्षभरात सोने आणि चांदीचे दर सुसाट वाढले. अनेक रेकॉर्ड मोडले तर अनेक विक्रम नावावर नोंदवले आहेत.

सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 73 हजार रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. 

देशांतर्गत बाजाराप्रमाणेच शुक्रवारी जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या किमती महागल्या आहेत.

जागतिक घडामोडी तसेच देशांतर्गत बाजारात वाढत्या मागणीमुळे आगामी काळात सोन्याचे दर आणखी महागण्याची शक्यता आहे.

सोने ही नेहमी सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. मागणी वाढल्याने पुरवठा करण्यास अडचणी येऊ शकतात. 

सुरक्षित गुंतवणूक असल्याने सोन्याची किंमत वाढत जाते.

इस्रायल-इराण मधील युद्धाचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होऊ शकतो. आणि भविष्यातील अस्थिरता पाहता सोन्यातील गुंतवणूक वाढेल.

युद्धाच्या स्थितीमुळे गोल्ड लोनमध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते. 

युद्धजन्य परिस्थितीत स्टॉक मार्केट क्रॅश होऊ शकते पण सोन्याचे भाव चढेच राहतात.

आता लग्नसराईचे दिवस असल्याने  सोन्याची किंमत वाढण्याचाच अंदाज आहे.