नववर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
नवीन वर्षाच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा सोन्याच्या दरात वाढ झाली असून 390 रुपयांनी दर वाढले आहेत.
आज शुक्रवारी, 03 जानेवारील सराफा बाजारात 24 कॅरेटच्या 10 ग्रॅमचा दर 77469 रुपये आहे.
विविध शहरांमध्ये ग्राहकांना सोने खरेदी करायचे असल्यास त्यामध्ये साधारण 900 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
दिल्ली, चंदीगड, जयपूर, लखनौ, पाटणा या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 79350 रुपये आहे.
मुंबई, नागपूर या शहरांमध्ये सोन्याच्या दरात 870 रुपयांची वाढ झाल्याने हे दर 10 ग्रॅमचा दर 79,250 रुपये आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात 110 रुपयांची वाढ झाली होती. तिथं सोन्याचा दर 77828 रुपये होता.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने हे दर जारी केलेले आहेत. पण दुकानांमधील दर 200 हजारांपेक्षा अधिक असू शकतात.
सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने गुंतवणूकदारांना अजून देखील सोन्यात गुंतवणुकीची संधी आहे.