गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून आणि आजही दागिन्यांसाठी पहिला पर्याय म्हणून अनेक जण सातत्याने सोने आणि चांदीच्या दरावर लक्ष ठेवून असतात.
भारतात सोन्याच्या दरात दररोज बदल होत असतात. सोने, चांदीच्या दरावर जागतिक बाजाराचा प्रभाव पडत असतो.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती, सणांच्या काळातील आणि लग्नसराईतील वाढती मागणी याचा परिणाम देखील सोने आणि चांदीच्या दरावर होतो.
अमेरिकेचे 47 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात व्यापार आणि टॅरिफ संदर्भातील धोरण मांडलं. यानंतर सोन्याच्या दरात वाढ दिसून आली.
भारतात 22 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 81220 रुपये इतका आहे. 22 कॅरेट सोन्याचा एका ग्रॅमचा दर 74490 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याच्या दरात कालच्या तुलनेत घसरण झाली आहे. तर, एक किलो चांदीचा दर 96 हजार 400 रुपये किलो आहे.
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रुपयांची घसरण झाली. 10 ग्रॅम सोन्याचा दर 81120 रुपये इतका आहे.
मुंबईत चांदीच्या दरात देखील घसरण दिसली. चांदीचे दर 100 रुपयांनी घसरले असून एक किलो चांदीचा दर 96 हजार 500 इतका आहे.
भारतातील दक्षिणेकडील सर्वात महत्त्वाचं शहर असलेल्या चेन्नईत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 81220 रुपये आहे.
शेअर बाजारात घसरण होत असल्यानं सोने आणि चांदीमधील गुंतवणुकीला गुंतवणूकदारांकडून प्राधान्य दिलं जात आहे.