जगभरात सध्या नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष आहे.

31 डिसेंबरच्या रात्री 12 चा टोला पडला की भारतात नवीन वर्षाचा जल्लोष सुरू होईल.

तुम्हाला माहीत आहे का, जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी नवीन वर्षाचे स्वागत केले जाते.

किरिबाती येथील ख्रिसमस बेटांवर 2025 चे आगमन सर्वात आधी होईल. हे प्रशांत महासागरातील एक छोटेसे  बेट आहे.

भारतीय वेळेनुसार 31 डिसेंबरला दुपारी 3 वाजून 31 मिनिटांनी येथे नवीन वर्षाचे आगमन झाले.

किरिबाती येथील ख्रिसमस बेटांनंतर न्यूझीलॅंडने नवीन वर्षाचे स्वागत केले.

न्यूझीलँडनंतर ऑस्ट्रेलियातील सिडनी, मेलबर्न येथे नवीन वर्षाचे स्वागत झाले.

जपान, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्येही नवीन वर्षाचे आगमन भारताच्याही आधी होईल. तेव्हा भारतात 31 तारखेचे 8.30 वाजले असतील.

भारत, श्रीलंकेनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात नवीन वर्षाचे स्वागत होईल.

हवाई येथील बेकर आणि हाउलॅंड येथील निर्जन बेटांवर सगळ्यात शेवटी नवीन वर्षाचे आगमन होईल.