उन्हाळा असह्य झाला आहे. त्यातच हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

कोकणासह मुंबई ठाण्यात उष्णतेची लाट आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आण विदर्भाचा पारा यापूर्वीच वाढला आहे.

यापासून स्वत:चा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी या काही सोप्या गोष्टी

तहान लागलेली नसली तरी  दर अर्ध्या तासाने पाणी प्यावे

दुपारी 12 ते 3 दरम्यान घराबाहेर पडू नये

घराबाहेर पडणे अगदी आवश्यक असेल तर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, ऊसाचा रस, लिंबू-पाणी असे पदार्थ प्यावेत

आवडत असेल तर ताक, घरी बनवलेली लस्सी, कैरीचे पन्हे हे पदार्थ देखील उपयोगी ठरू शकतात.

उन्हाचा खूप त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

उन्हात काम करत असाल तर  ओल्या कपड्याने मान, चेहरा झाका. थोड्या थोड्या वेळाने चेहऱ्यावर पाणी मारा