भारतात HMPV चा पहिला रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे.

 ह्युमन मेटान्यूमोव्हायरसची लागण झाल्यानंतर रुग्णामध्ये कोरोनासदृश्य लक्षणे दिसून येतात.

या व्हायरसमुळे रुग्णाला खोकला किंवा घसा खवखवणे, सर्दी किंवा नाक वाहाणे, श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.

लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्तींना या व्हायरसची लागण होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. कारण त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते.

आरोग्य विभागाने या व्हायरसशी संबंधित काही नियमावली जाहीर केलेल्या आहेत.

जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका

साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.

ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.