महाराष्ट्रातील नागपूर येथून भाजपाने सलग तिसऱ्यांदा नितीन गडकरी यांना तिकीट दिले आहे.

महाविकास आघाडीकडून काँग्रेसने विकास ठाकरे यांना नागपूरला निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.

मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये काँग्रेसचे नकुल नाथ रिंगणात असून 44 वर्षांपासून कमलनाथ यांच्या कुटुंबाचा हा बालेकिल्ला आहे.

छिंदवाडा मतदारसंघात भाजपाचे विवेक बंटी साहू यांचे नकुल नाथ यांना आव्हान आहे.

राजस्थानच्या बिकानेरमध्ये भाजपाचे अर्जुन राम मेघवाल हे चौथ्यांदा काँग्रेसचे गोविंदराम मेघवाल यांच्याविरोधात लढत आहेत.

2009पासून सलग चार वेळा भाजपाने बिकानेरमध्ये विजय मिळावला आहे. यावेळी गोविंदराम मेघवाल जिंकतील, असा अंदाज आहे

राजस्थानच्या नागौर मतदारसंघात भाजपाच्या ज्योती मिर्धा आणि इंडि आघाडीकडून हनुमान बेनीवाल रिंगणात आहेत.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून जोति मिर्धा आणि भाजपाप्रणित एनडीएकडून हनुमान बेनीवाल एकमेकांसमोर होते.

आसाममधील जोरहाट मतदारसंघात काँग्रेसने माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा मुलगा गौरव गोगोई यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपाने विद्यमान खासदार तपन गोगोई यांना जोरहाट मतदारसंघातून तिकीट दिले आहे. दोघेही प्रभावशाली अहोम समाजातील आहेत.