2007नंतर भारताने 2024मध्ये ICC T-20 विश्वचषक आपल्या नावावर केला.

अंतिम सामन्यातील 76 धावांसाठी विराट कोहलीला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.

स्पर्धेतील एकूण 15 विकेटसाठी जसप्रीत बुमराह ला ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कार देण्यात आला.

भारताने पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये एकूण 6 पदकं जिंकली.

पॅरालिम्पिकमध्ये भारताने एकूण 29 पदकं जिंकली. यामध्ये 7 सुवर्ण, 9 रौप्य तर 13 कांस्य पदकांचा समावेश

45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय महिला-पुरुषांच्या टीमने सुवर्णपदक जिंकले.

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डोम्माराजू गुकेशने इतिहासाला गवसणी घातली.

विश्वनाथन आनंदनंतर देशाला दुसरा विश्वविजेता मिळाला.

फुटबॉलपटू सुनील छेत्रीनं आपल्या 19 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केला.