मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जने 20 धावांनी मुंबईचा पराभव केला.

चेन्नईने दिलेल्या 207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने केवळ 6 बाद 183 धावा केल्या.

ऋतुराज गायकवाडच्या 69 आणि शिवम दुबेच्या 66 धावांच्या जोरावर संघाने 150 अधिक धावा केल्या.

या सामन्यातील मुंबईच्या पराभवामुळे रोहित शर्माचे शतक व्यर्थ गेले. रोहित शर्माने 61 चेंडूत 100 धावा केल्या.

चेन्नईचा वेगवान गोलंदाज पाथिराना याने या सामन्यात 4 गडी बाद केले.

पाथिराना याने मुंबईच्या 3 मोठ्या फलंदाजांना बाद केल्याने संघ बॅकफूटवर केला.

हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर महेंद्रसिंह धोनी याने सलग तीन षटकार मारले.

हार्दिक पंड्याने 3 षटकांत 2 विकेट घेत 43 धावा दिल्या.

इशान किशनने फलंदाजीवेळी 23 धावा केल्या.