पाकिस्तानची जवेरिया खानम आता भारताची सून होणार आहे.

कोलकाता येथील समीर खान आणि कराचीमध्ये राहणारी जवेरिया यांची जर्मनीत शिकत असताना त्यांची भेटी झाली. यानंतर दोघेही प्रेमात पडले.

जवेरिया आणि समीर खान या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि 2018 मध्ये साखरपुडा केला होता.

जवेरिया ही पाकिस्तानमधून मंगळवारी (5 डिसेंबर) अटारी सीमेवरून अमृतसरला पोहोचली. समीर आणि भावी सासरे अहमद कमाल खान युसुफझाई यांनी 'ढोल'च्या तालावर जवेरियाचे भारतात स्वागत केले.

भारत सरकारने जवेरिया खानम यांना 45 दिवसाचा व्हिजा मिळाला असून दोघेही पुढच्या वर्षी 6 जानेवारीला विवाह बंधनात अडकणार आहे.