कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक करणारे फलंदाज?
कसोटी क्रिकेट संयमाने खेळण्यासाठी
ओळखले जाते.
पाच दिवस सामना चालणार असल्यामुळे खेळाडू जास्त वेळ मैदानावर टिकून धावा करण्याचा प्रयत्न करतात.
पण असे काही फलंदाज आहेत, ज्यांनी कसोटी फॉरमॅटमध्ये टी-20 स्टाईलमध्ये फलंदाजी करत झटपट धावा केल्या आहेत.
आज आम्ही तुम्हाला अशा खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी भारतासाठी कसोटीत सर्वात जलद अर्धशतक झळकावले आहे.
विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने 2022 साली श्रीलंका विरुद्ध 28 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले होते.
दुसऱ्या स्थानावरही ऋषभ पंत आहे, ज्याने नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यात 29 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
मात्र ऋषभ पंत 2022 मध्ये
28 चेंडूंमध्ये अर्धशतक
पूर्ण करण्याचा विक्रम मोडू शकला नाही.
कपिल देव तिसऱ्या स्थानावर आहेत. ज्यांनी 1982 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.
शार्दुल ठाकूर हा चौथ्या स्थानावर असून त्याने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध 31 चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.
यशस्वी जायस्वाल हा पाचव्या स्थानावर असून त्याने 2024 मध्ये बांग्लादेशविरुद्ध 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आहे.