Fill in some text

अलीकडे डिजिटल ऍरेस्ट हा शब्द सातत्याने ऐकू येतो आहे. एक व्हिडीओ कॉल किंवा ईमेल आणि तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.

पोलीस, ईडी, सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून तुम्हाला अशा पद्धतीने गंडवले जाते की ते खोटं आहे, हे तुम्हाला कळतही नाही.

आधी मेसेजवर लिंक यायची, त्यावर क्लिक केलं की बँक खात्यातील सगळे पैसे गायब.

लकी ड्रॉ, लॉटरी लागल्याचे सांगून सायबर ठग लुटायचे. पण, आता त्यांनी थेट डिजिटल अरेस्ट प्रकार सुरू केले आहेत. 

यात अनेक उद्योजक, प्रसिद्ध व्यक्ती फसले आहेत. त्यांच्याकडून या सायबर ठगांनी कोट्यवधी रुपये उकळले.

काही दिवसांपूर्वी वर्धमान ग्रुपनचे चेअरमन आणि पद्मभूषण एस.पी. ओसवाल हे या सायबर ठगांच्या जाळ्यात अडकले आणि 7 कोटी गमावून बसले.

डिजिटल अरेस्ट हा सायबर गुन्हेगारीतील नवा प्रकार आहे.

सायबर ठग व्हिडीओ कॉल करतात आणि पोलीस असल्याचे किंवा सीबीआय अधिकारी, ईडी अधिकारी असल्याचे तुम्हाला सांगतात. 

डिजिटल अरेस्ट फ्रॉड करणारे तुम्हाला काही दिवस तुम्ही जिथे आहात, तिथेच अरेस्ट करून ठेवू शकतात.

Fill in some text

तुम्हाला घाबरवल्यानंतर सायबर ठग म्हणतात की, व्हिडीओ कॉल कट केला, तर आम्ही तिथे येऊन अटक करू आणि तुरुंगात टाकू.