यंदाच्या निवडणुकीत अनेक सिने अभिनेता/अभिनेत्री राजकारणात उतरणार आहेत. कंगना रणौत, हेमा मालिनी, अरुण गोविल, रवि किशन, शत्रुघ्न सिन्हा, राज बब्बर आदी कलाकार राजकीय नशीब आजमावणार आहेत.

क्वीन, पेज 3 अशा चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. हिमाचल प्रदेशातील मंडी येथून कंगना भाजपाच्या तिकिटावर  ही निवडणूक लढवणार आहे.

ड्रीम गर्ल अर्थात हेमा मालिनी सलग तिसऱ्यांदा मथुरा येथून निवडणूक लढवणार आहे. हेमा मालिनी यांनी 2004 मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला.

छोट्या पडद्यावरील 'राम' अशी ओळख असणारे अरुण गोविल यांनी यावेळी निवडणुकीला उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. अरुण गोविल मेरठ येथून भाजपाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

खामोश या शब्दामुळे फेमस झालेले अभिनेता शत्रुघ्न सिन्हा तृणमूलच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. त्यापूर्वी ते भाजपचे खासदार होते. मात्र, नंतर ते भाजपातून बाहेर पडले. 

अभिनेता रवि किशन यांनी 2017 मध्ये भाजपात प्रवेश केला. 2019 मध्ये त्यांनी गोरखपूर येथून निवडणूक लढवली. या निवडणुकीतही ते गोरखपूर येथूनच निवडणूक लढवतील.

भोजपुरी गायक, अभिनेता मनोज तिवारी यांनी 2009 मध्ये राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला समाजवादी पक्षाकडून लढणारे ते आता भाजपाकडून निवडणूक लढवतात. 

राज बब्बर हे यंदा पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेच्या तिकिटावरून ते गुडगाव येथून निवडणूक लढवतील.

अभिनेता पवन कल्याण आंध्र प्रदेशातील पीठापुराम येथून निवडणूक लढवणार आहे. भाजपाच्या तिकिटावर ते ही निवडणूक लढवतील.

काही कलाकारांना राजकीय प्रवासात देखील प्रेक्षकांचे, जनतेचे प्रेम मिळाले. तर काहींना ही जबाबदारी सांभाळता आली नाही. आणि त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला.