पेम्मासानी चंद्रशेखर यांनी गुंटूर लोकसभा मतदारसंघातून तेलुगू देसम पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पेम्मासानी चंद्रशेखर यांच्याकडे 5,785.28 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

चंद्रशेखर यांची वैयक्तिक संपत्ती 2448.72 कोटी तर, पत्नीची मालमत्ता सुमारे 2343.78 कोटी रुपये आहे.

चंद्रशेखर हे डॉक्टर असून त्यांनी वेगवेगळ्या व्यवसायात यश संपादन केले  आहे. 2022-23मध्ये त्यांचे उत्पन्न 3 लाख 68 हजार 840 रुपये होते.

पेम्मासानी चंद्रशेखर यांची पत्नी कोनेरू श्रीरत्न यांनी याच कालावधीत 1 लाख 47 हजार 680 रुपये कमावले होते.

चंद्रशेखर यांच्याकडे 2,316 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यामध्ये मुदत ठेवींसह इतर गुंतवणुकीचा समावेश आहे.

Caption

कोनेरू श्रीरत्न यांच्याकडे 2,289 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

चंद्रशेखर यांच्याकडे 72 कोटी 24 हजार 245 रुपयांची आणि श्रीरत्न यांच्याकडे 34 कोटी 82 लाख 22 हजार 507 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

चंद्रशेखर यांच्यावर 519 कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि त्यांच्या पत्नीवरही तेवढेच कर्ज आहे.

या दाम्पत्याचे जगभरातील सुमारे 101 कंपन्यांमध्ये संयुक्त शेअर्स आहेत.