गेल्या 12 निवडणुकांपैकी 1991मध्ये सर्वात कमी 55.9 टक्के मतदान झाले होते.

सर्वाधिक मतदानाची नोंद 2019मध्ये झाली होती; त्यावेळी 67.4 टक्के मतदान झाले होते.

एकूण 12पैकी 7 निवडणुकांमध्ये मतदानाच्या एकूण टक्केवारीत वाढ नोंदवली गेली.

या निवडणुकांचे निकाल पाहिल्यानंतर 7 पैकी 4 वेळा सरकार बदलल्याचे  स्पष्ट होते.

1984, 2009 आणि 2019च्या निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढल्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना झाला.

एकूण 12पैकी 5 निवडणुकांमध्ये मतदानाच्या टक्केवारीत घट झाली होती.

जेव्हा-जेव्हा मतदानाची टक्केवारी कमी झाली, तेव्हा 4 वेळा सरकार बदलले.

1980, 1989, 1991 आणि 2004 या निवडणुकांनंतर केंद्रात सत्तापालट झाला.

पाचपैकी एकदाच (1999) मतदानाची टक्केवारी कमी होऊनही सत्ताधारी विजयी झाले होते.

2009, 2014 आणि 2019 या सलग तीन निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी  वाढतीच आहे.