येत्या 26 एप्रिलला होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील 1198पैकी 1192 उमेदवारांकडे सरासरी 5.17 कोटींची संपत्ती आहे.

पहिल्या 10 श्रीमंत उमेदवारांपैकी सर्वाधिक 5 कर्नाटकात निवडणूक लढवत आहेत.

काँग्रेसच्या 68 उमेदवारांकडे सरासरी 39 कोटी आणि भाजपाच्या 69 उमेदवारांकडे सरासरी 24 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

विशेष म्हणजे, सहा उमेदवारांनी आपल्याकडे कोणतीही मालमत्ता नसल्याचे जाहीर केले आहे.

धनाढ्य उमेदवारांमध्ये कर्नाटकातील काँग्रेसचे व्यंकटरमाने गौडा पहिल्या क्रमांकावर आहेत.

व्यंकटरमाने गौडा यांच्याकडे सुमारे 622 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

बंगळुरू ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार डीके सुरेश यांच्याकडे 593 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

धनाढ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले डीके सुरेश हे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे बंधू आहेत.

मथुरेतील भाजप उमेदवार हेमा मालिनी तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्याकडे 279 कोटींची मालमत्ता आहे.

इलेक्शन वॉच / एडीआरने 1192 उमेदवारांच्या शपथपत्रांचे विश्लेषण केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.