लोकसभा निवडणुकीस सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिलला झाले.

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 12 राज्यांतील एकूण 88 जागांसाठी मतदान होणार आहे. 

महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ वाशीम, हिंगोली, वर्धा, नांदेड, परभणी, अमरावती, येथे दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात सीपीआयचे ॲनी राजा आणि एनडीएचे के सुरेंद्रन आहेत.

मथुरा लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री, विद्यमान खासदार आणि भाजपच्या उमेदवार हेमा मालिनी यांच्या विरोधात काँग्रेसचे मुकेश धनगर हे लढत आहेत.

काँग्रेस खासदार शशी थरूर केरळमधील तिरुअनंतपुरम येथून उमेदवार आहेत. भाजपने तेथे राजीव चंद्रशेखर तर डाव्यांनी पणियान रवींद्रन यांना उमेदवारी दिली आहे.

नवनीत राणा या महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात मविआने वानखेडे यांना उभे केले आहे.

छोट्या पडद्यावरील राम अर्थात अरूण गोविल हे भाजपाच्या चिन्हावर मेरठ येथून निवडणूक लढवत आहेत. 

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे अकोला येथून निवडणूक लढवतील. त्यांच्यासमोर भाजपाच्या अनुप धोत्रे आणि कॉंग्रेसच्या डॉ. अभय पाटील यांचे आव्हान असेल.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे राजस्थानच्या कोटा येथून भाजप उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रल्हाद गुंजाळ हे उमेदवार आहेत.