एका उमेदवारांपैकी  सात जणांनी यापूर्वी आपल्याला दोषी ठरवण्यात आले असल्याची माहिती दिली आहे.

244 उमेदवारांपैकी पाच जणांवर खुनाचे तर  24 जणांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत.

महिलांशी संबंधित गुन्हे दाखल असलेले 38 उमेदवार असून 17 जणांविरुद्ध हेट स्पीचचे गुन्हे दाखल आहेत.

तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांकडे सरासरी 5.66 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

एकूण 1352 उमेदवारांपैकी 29 टक्के म्हणजेच 392 उमेदवार करोडपती आहेत.

करोडपती उमेदवारांपैकी एका उमेदवाराकडे  सर्वाधिक 1,361 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

एकूण 47 टक्के किंवा 639 उमेदवारांची शैक्षणिक पात्रता इयत्ता 5वी ते इयत्ता 12वीपर्यंत आहे.

तर 44 टक्के किंवा 591 उमेदवार पदवीधर आहेत किंवा त्यांच्याकडे उच्च शैक्षणिक पात्रता आहे.

वयोमानानुसार, 30 टक्के किंवा 411 उमेदवार 25-40 वयोगटातील आहेत.

तर 53 टक्के किंवा 712 उमेदवार 41 ते 60 वयोगटातील आहेत.