दुसऱ्या टप्प्यातील सर्वात श्रीमंत 10 उमेदवारांमध्ये 5 कर्नाटकातील आहेत.

जास्त कर्ज जाहीर करणाऱ्या 10 उमेदवारांपैकी चार काँग्रेसचे, चार भाजपचे आणि एक जेडी (एस)चे आहेत.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे भाऊ डी.के. सुरेश रिंगणात असून त्यांच्याकडे 593 कोटींची संपत्ती आहे.

बंगळुरू ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढविणारे डी.के. सुरेश हे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार आहेत.

सर्वाधिक कर्ज असलेल्यांमध्ये डी.के. सुरेश पहिल्या क्रमांकावर असून त्यांनी 150 कोटींचे कर्ज जाहीर केले आहे.

मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथील काँग्रेस उमेदवार संजय शर्मा 98 कोटींच्या कर्जासह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

मंड्यामधील जनता दल (सेक्युलर)चे उमेदवार एचडी कुमारस्वामी 82 कोटी रुपयांच्या कर्जासह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील या उमेदवारांवर जवळपास  300 कोटींची कर्जे आहे.

व्यवसाय कर्ज, वैयक्तिक कर्जाच्या व्यतिरिक्त दूरध्वनी, पाणी, वीज, घरभाडे, जीएसटी, मालमत्ता कर  यांची थकबाकी या कर्जात  समाविष्ट आहे.

इलेक्शन वॉच ADRने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले आहे.