2019च्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यात कर्नाटकातील मंड्या मतदारसंघात सर्वाधिक  81.3 टक्के मतदान झाले.

उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघात सर्वात कमी 49.3 टक्के मतदान झाले.

2019च्या लोकसभा निवडणुकीत मंड्यामध्ये 80.59 टक्के आणि मथुरामध्ये 61.8 टक्के  मतदान झाले होते.

मांड्या, नागाव, त्रिपुरा पूर्व, बाह्य मणिपूर, दररंग-उदलगुरी, हसन, तुमकूर, वडकारा, कोलार आणि कन्नूर येथे सर्वाधिक मतदान झाले.

मंड्यावगळता 2019मध्ये इतर नऊ जागांवर मतदानाची टक्केवारी यावेळच्या तुलनेत जास्त होती.

मथुरामध्ये 2019च्या तुलनेत मतदानात खूप घसरण झाली.

मथुरामध्ये 2019मध्ये  62 टक्के तर, 2024मध्ये  49 टक्के मतदान झाले.

रीवा, गाझियाबाद, भागलपूर, बंगळुरू दक्षिण, गौतम बुद्ध नगर, बंगळुरू मध्य, बंगळुरू उत्तर, बांका, बुलंदशहर येथेही कमी मतदान झाले.

2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2024मध्ये काही जागांवर मतदानाची टक्केवारी वाढली.

चित्रदुर्ग, वर्धा, कांकेर, बंगळुरू ग्रामीण आणि  मंड्या या जास्त मतदान झालेल्या टॉप-5 लोकसभा  जागा आहेत.