भाजपाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी एनडीएने या समाजाला केवळ तीन तिकिटे दिली आहेत.

गेल्या निवडणुकीत  7 जागांवर उमेदवारी देणाऱ्या भाजपाने केरळमध्ये एकमेव मुस्लिम उमेदवाराला संधी दिली आहे.

भाजपाचा मित्रपक्ष जदयूने बिहारच्या किशनगंजमध्ये तर दुसरा मित्रपक्ष एजीपीने आसाममध्ये एका मुस्लिस उमेदवार दिला आहे.

बिहारमधील 40 जागांपैकी सत्ताधारी आणि प्रमुख विरोधकांकडून केवळ चार मुस्लिम उमेदवारांना संधी मिळाली आहे.

महाराष्ट्रात मविआ आणि महायुती यांनी एकही  मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवलेला नाही.

विरोधकांपैकी काँग्रेस, सपा, राजद, एनसीपी एसपी, नॅशनल कॉन्फरन्स, ठाकरे यांनी या समाजातील केवळ 31 उमेदवार उभे केले आहेत.

गेल्या निवडणुकीत 32 जागांवर मुस्लिम समजाला संधी देणाऱ्या काँग्रेसने यावेळी केवळ 21 जागांवर तिकिटे दिली आहेत.

समाजवादी पार्टीने केवळ  चार मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत.

गेल्या निवडणुकीत फक्त 6 मुस्लिम उमेदवार उभे करणाऱ्या बसपाने यावेळी यूपीमध्ये 64 पैकी 18 तिकिटे मुस्लिमांना दिली आहेत.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे 5 तर डाव्या आघाडीचे सहा उमेदवार मुस्लिम आहेत.