निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यांतील 2,823 उमेदवारांपैकी केवळ 235 महिला उमेदवार होते.

पहिल्या दोन टप्प्यांत फक्त 8% महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली.

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण  1625 उमेदवारांपैकी  135 महिला होत्या.

दुसऱ्या टप्प्यात  1198 उमेदवारांपैकी 100 महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या.

पहिल्या टप्प्यातील 135 महिला उमेदवारांपैकी तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 76 महिला उमेदवार होत्या.

महिला उमेदवारांचा हा आकडा राज्यातील एकूण उमेदवारांच्या केवळ  आठ टक्के होता.

दुसऱ्या टप्प्यात केरळमध्ये सर्वाधिक 24 महिला उमेदवार होत्या.

दोन्ही टप्प्यांत भाजपाकडून सर्वाधिक महिला उमेदवारांना तिकीट देण्यात आले.

दोन्ही टप्प्यांत मिळून भाजपाने 69 महिलांना उमेदवारी दिली.

काँग्रेसने दोन्ही टप्प्यांत  44 महिलांना संधी दिली.